कापली नाहीत अजूनी...
कापली नाहीत अजुनी तेवढी मी अंतरे
योजिली आहेत माझी मी निराळी अंबरे
मी भरारी घेतली अन् दशदिशा भारावल्या
वेधले मी या नभाचे कोपरे अन् कोपरे....
मी मनाच्या ताकदीने पंख हे फैलावले
अन् क्षणातच मुक्त झाले हे युगांचे पिंजरे
जे जसे वाट्यास आले ते तसे स्वीकारले
शोधले नाही कधीही मी सुखाचे आसरे
(Live at panwel,maharashtra.)
गायक - मयूर महाजन
गझलकार - जनार्दन म्हात्रे
संगीतकार - सुधाकर कदम
तबला - निषाद कदम
सारंगी - उस्ताद लियाकत अली खान
गिटार - मिलींद शेवरे
सूत्र संचलन - प्रशांत पेंडसे
2 comments:
मी भरारी घेतली अन् दशदिशा भारावल
वेधले मी या नभाचे कोपरे अन् कोपरे....
खुप सुरेख. शब्दांची ताकद तुमच्या सारखा कलावंतच जाणू शकतो.
शेतकऱ्याची चिंता आहे कुणाला ?
Post a Comment