गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, April 2, 2013

"गझलोत्सवप्रतिष्ठानम्"





स्थापून ’प्रतिष्ठाना’, करतात सावकारी 
भरवून ’उत्सवाला’,  देतात ते ’सुपारी’

दरसाल भरविती हे ’साहित्य सेल’ मोठे
करण्यास नवकवींची पिळणूक छान सारी

लाचार पंडितांना फिरवोनिया सभोती
खंजीर खुपसती ते हळुवार,भर दुपारी

तळमळ कुठे दिसे ना काळीज भेदणारी
तरिही ’अम्ही स्वयंभू’ बोंबा खुशाल मारी

याने असे करावे,त्याने तसे करावे
जो ना करेल त्यांच्या हातात ये ’तुतारी’

संभाविताप्रमाणे देऊन उपाध्या ’त्या’
घेण्यास मस्त बदला करतात साठमारी

तोंडास ना कुणाच्या धरबंध राहिलेला
याची नजर विखारी,त्याचे विचार भारी

’कट्टा’च जो गझलचा,म्हणवोनि ’गझलरंग’
’यू ट्यूब’ वरिल शिर्षक चोरून डींग मारी

(’गझलरंग’ हे यू ट्यूब वरील एका 
जुन्या लोकप्रिय ’चॅनल’चे नाव आहे.)

अनुदान शासनाचे पाडून घेत पदरी
गझलेस देत आहे ते नवनवी उभारी

सुधाकर कदम




संगीत आणि साहित्य :