सर्जनशीलता
आणि शेतकरी
जवळिक भारी
मोहतुंबी...
कष्ट आणि घाम
भूईत पेरता
हिरवीगार माता
बारोमास...
मानव निसर्ग
एक अनुबंध
नर-नारी बंध
साक्षात्कारी...
वंश सातत्याचा
अर्थ घनदाट
भावना उत्कट
अंगभूत...
निसर्गाचा रस
रूप स्पर्श गंध
नवाच प्रबंध
उत्कटतेचा...
कोणे एके काळी
समाज जीवन
घेई कामातून
आनंदचि...
सार्या या कष्टाला
भावविभ्रमाची
आणि शृंगाराची
जोड होती...
राबणार्या मनी
चैतन्य झालर
राबण्याचा भार
वाटेचि ना...
सळसळणार्या
शृंगारप्रधान
’लावणी’चे वाण
इथलेच...
समाज व्यवस्था
करिते विकास
प्रेमभाव श्वास
जेव्हा वसे...
झालाय खटारा
राबून खाणारा
मारून खाणारा
लोटपोट...
सुधाकर कदम
No comments:
Post a Comment