गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, December 12, 2012

१२.१२.१२ हा दिवस संगीत क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय वाईट ठरला.


प्रसिद्ध सतारवादक भारतरत्‍न पं. रविशंकर यांचे आज अमेरिकेत निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. अमेरिकेच्‍या सॅन दिआगो शहरात त्‍यांचे निधन झाले. भारतीय संगीत क्षेत्राला हा फार मोठा धक्‍का आहे.

रविशंकर यांनी भारतीय संगीत सातासमुद्रापार नेले. भारतीय संगीताला जगामध्‍ये आदराचे स्‍थान मिळवून देणा-यांमध्‍ये रविशंकर यांचा समावेश होतो. पाश्‍चात्‍य देशांना भारतीय संगीताची नवी ओळख करुन दिली. रविशंकर यांचा तीन वेळा ग्रॅमी पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले होते. यावरुन त्‍यांच्‍या संगीत कौशल्‍याची जगाने घेतलेली दखल सिद्ध होते.

रविशंकर यांना 1999 मध्‍ये देशाचा सर्वोच्‍च नाग‍री सन्‍मान 'भारतरत्न'ने सन्‍मानित करण्‍यात आले होते.

रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार जॉर्ज हॅरिसन यांच्या सोबत जॅझ, अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीत अशा विविध प्रवाहांवर काम केले.


१९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत नेक कार्यक्रम केले. यात एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे.

१९६५ साली बीटलसच्या जॉर्ज हॅरिसन यांनी सतार शिकण्यास सुरूवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. जॉर्ज हॅरिसन हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. या काळात रवी शंकरांनी मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, कॅलिफोर्निय़ा; १९६९ साली वॅडस्टक फेस्टिव्हल यात सहभाग घेतला. त्यांना व्याख्याने देण्यासाठीही अनेक महाविद्यालयांतून निमंत्रणे येत.

इ.स. १९७१ सालच्या बांग्लादेश मुक्तीसंग्रामास पाठिंबा दर्शिविणाऱ्या जॉर्ज हॅरिसन आयोजित न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध कन्सर्ट फॉर बांग्लादेश या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली. पाश्चात्य संगीतविश्वातील विख्यात असामी व व्हायोलिनवादक यहुदी मेनुहिन यांच्या सोबत केलेले सतार-व्हायोलिन कॉम्पोजिशनने त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात उच्चस्थानी बसवण्यास सहाय्यभूत ठरली.

त्यांचे आणखी एक विख्यात कॉम्पोजिशन म्हणजे जपानी बासरी साकुहाचीचे प्रसिद्ध वादक ज्यँ पियेरे रामपाल, गुरु होसान यामामाटो व कोटो (पारंपारिक जपानी तंतूवाद्य - कोटो)चे गुरु मुसुमी मियाशिता यांच्या सोबतचे कॉम्पोजिशन. १९९० सालचे विख्यात संगीततज्ञ फिलिप ग्रास सोबतची रचना पॅसेजेस ही त्यांची आणखी एक उल्लेखयोग्य रचना. २००४ साली पंडित रवि शंकर फिलिप ग्रासच्या ओरियन रचनेत सतारवादक 

’सुधाकरी’

.

No comments:





संगीत आणि साहित्य :