गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, November 10, 2012

सिद्धी...


किती काळ जुनी
सांभाळावी  रीत
आयुष्याचा घात
करणारी...

प्रत्येक मर्यादा
हिताची असते
असेही  नसते
सर्वकाळ...

उगिच ज्येष्ठता
सांभाळाया जाता
आपुल्या क्षमता
मातीमोल...

चौकटी बाहेर
पडल्याशिवाय
प्रगतीची ’साय’
मिळेचि ना...

छाप पाडण्यासि
इंग्रजी बोलणे
लोका हे सांगणे
खोटे का गा ?

शक्ती उपासना
करावयासाठी
मजबूत ’यष्टी’
आवश्यक...

पेहराव असाच
करावा नेहमी
कोणतीच कमी
दिसो नये...

चांगले जीवन
जगाया साधन
उत्कृष्ट शिक्षण
आवश्यक...

सुंदर दिसणे
सुंदर बोलणे
सुंदर वागणे
हीच सिद्धी...


सुधाकर कदम

No comments:





संगीत आणि साहित्य :