फेसाळते प्याले
सिगारेट ’कश’
संगीत कर्कश
आवडते...
तंग कपड्यात
खेटून चालणे
रात्रीचे धिंगाणे
नेहमीच...
सिगारेट-मद्य
नाच-गाणी-पार्टी
नेमक्या या गोष्टी
काय देती...?
असले अनेक
प्रश्न विचारोनि
भंडावी नेहमी
तरूणांना...
बेजबाबदार
याच कारणाने
त्यांना ठरविणे
योग्य नसे...
अनुभवासह
वेळही ज्यांपाशी
तेच दूर देशी
आजा-आजी...
कुटुंब व्यवस्था
मोडकळी येता
ही मानसिकता
येणारच...
’आमच्या वेळेस
असे नव्हतेच’
कंटाळती तेच
ऐकोनिया...
तरूण विचार
समजून घेण्या
थोडा वेळ त्यांना
देत जावा...
यातीलच काही
युवा उघडती
विक्रमाची खाती
जागतिक...
-तरूण मित्रांनो-
आनंद घेण्याच्या
जागा भरपूर
करावा विचार
निवडण्या...
तरूणपणाला
इतके सवंग
समजून टांग
मारू नका...
सुधाकर कदम
No comments:
Post a Comment