गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, March 12, 2025

मज गायचेच आहे...


 विसरून वेदनांना मज गायचेच आहे

घायाळ काळजाला रिझवायचेच आहे


काट्यात राहुनीया गंधीत होत गेले

हे गंधणे अता मज टाळायचेच आहे


वाटे हवाहवासा सहवास मोगऱ्याचा

गजरे तुझ्या करांनी माळायचेच आहे


दुनिये तुझ्यापुढे मी हरले कबूल आहे

जे जे मला दिले ते सोसायचेच आहे


गायिक - प्राजक्ता सावरकर शिंदे

शब्द आणि संगीत -सुधाकर कदम

संगीत - सुधाकर कदम

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

व्हायोलिन - हरीश लांडगे

की बोर्ड - आशिष कदम

सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर


                           मैफल 

संत ज्ञानेश्वर सभागृह,अमरावती.दि.२६/१२/२०२४.    


#मराठी  #गझल  #गीतकार  #संगीतकार  #कवी 

#sudhakarkadamscomposition 

#prajaktasavarkarshinde

No comments:





संगीत आणि साहित्य :