"जरि दाखवती हे गवई शाहू न फुल्यांचा बाणा
प्रत्यक्ष गीत गाताना घेतात तुघलकी ताना..."
या डी.एन.गांगण यांच्या गझलचे विडंबन...
कृपया कोणीही गंभीरपणे घेऊ नये,ही नम्र विनंती.
प्रत्यक्ष गीत लिहुनीया चाटतात का पायांना
भाषांतर करणार्याचे डबक्यातच बेडुक होते
जो तरन्नुमावर तरला तो पोपट एक शहाणा
उच्छाद मांडला आहे गायक नि गझलकारांनी
हा रसिक महाराष्ट्राचा अगतिक न केविलवाणा
बेइमान कुठले सांगा व इमानदारही कुठले
नांदून घरी दुसर्याच्या घे तिसर्याचाच उखाणा
खोर्याने उपसुन घेती देउनिया ‘टका’ कवींना
टाकती जणू उंटाच्या तोंडात जिर्याचा दाणा
कविता अन् गझलेमध्ये असतो ना फरक जरासा
हे समजुन ना घेणारे करतात उगीच ठणाणा
सुधाकर कदम
८/४/१०१५
No comments:
Post a Comment