जरी बंदिशाळा, तुझ्या भोवताली
मनी जागवा रे,भिमाच्या गजाली.
नको वेगळा तो,दुहीचाच झेंडा
मला काळजीने,जयंती म्हणाली.
तुला झगमगीचा,नको मोह वेड्या
कधी काजव्यांनी,उजळल्या मशाली?
किती झुंजला तो,तश्या काळरात्री
तुम्हा वारश्याने,तिजोरी मिळाली.
सरो राजनीती,अशी धर्मवेडी
ठरो लोकशाही,तुझी दीर्घकाली.
गायक-सुरेश वाडकर #sureshwadkar
शब्द-विजयालक्ष्मी वानखेडे #vijayalakshmiwankhede
संगीत-सुधाकर कदम #sudhakarkadam
संगीत संयोजन-मिलिंद गुणे #milindgune
ध्वनिमुद्रण-पंचम स्टुडिओ,पुणे.आणि आजिवासन स्टुडिओ,मुंबई.
व्हिडीओ-विवेक काजरेकर #vivekkajarekar
● गझलेला गीताचे रूप देऊन स्वरबद्ध केलेली ही रचना आपण जरूर ऐकावी.आजपर्यंत माझ्याकडून 'गझल' हा काव्यप्रकार जास्ती प्रमाणात स्वरबद्ध झाला.तो बाजच वेगळा.ही गझलच आहे,पण रसिकांपर्यंत सहजतेने पोहचून लोकप्रिय होण्याच्या दृष्टीने तिचा बाज वेगळा ठेवलाआहे.ऐका...
आवडल्यास प्रतिक्रिया द्या व चॅनल सबस्क्राईब करा.धन्यवाद!
●डॉ .बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जन्मगावी महू येथे डॉ.अनिल गजभिये ह्यांनी जयंती महोत्सवात ही गझल तिथे जमलेल्या अनुयायांना ऐकवून प्रकाशित केली.त्याबद्दल त्यांना व महू स्मारक समितीला मनापासून धन्यवाद!🙏




No comments:
Post a Comment