गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, June 22, 2015

न इस तरह भी खयालों मे कोई बस जाए...

):( Gσσ∂ ενεиιиG ):(






                                                     Live-Sanskruti Arts Festival,THANE.




न इस तरह भी खयालों मे कोई बस जाए

मैं अपने आप को सोचूँ,किसी की याद आए


तमाम रात रहा नींद का सफर जारी

सजे रहे किसी आँचल के मेहरबाँ साए


तुम्हारे पास पहुँचकर कुछ ऐसा लगता है

सफ़र से जैसे मुसाफिर वतन में आ जाए


वो चंद पल जो बचा लाए थे हम अपने लिए

सितम तो ये है के वो भी न हमको रास आए


हमारी जीत अलग है,हमारी हार अलग

ज़मानेवालो को ये बात कौन समझाए


गायिका-रसिका जानोरकर

संगीत-सुधाकर कदम

तबला-आशिष झा

सारंगी-फ़ारुख़ लतिफ़

संवादिनी-रामेश्वर

गिटार-मिलींद शेवरे

सूत्रसंचालन-दिलीप पांढरपट्टे

या अगोदर माझ्या दोन लेखांमध्ये तोडी रागाचा उल्लेख आलेला आहे.त्यात "मिलकर जुदा हुए","तुम्हारे शहर




का मौसम" तसेच मधुरानीने गायिलेल्या "वो जो हममे तुममे क़रार था" या गझलांच्या बंदिशींवर,त्यातील





वशिष्ठ्यांसह लिहिले होते.आज बशर नवाज़ साहेबांची "न इस तरह भी खयालों मे कोई बस जाए" या 





गझलच्या माझ्या बंदिशीबद्दल थोडे सांगावेसे वाटते आहे.या गझलची पहिली ओळ मंद्र सप्तकातील कोमल 





धैवतापासून सुरू होऊन मध्य सप्तकातील कोमल धैवतावर जाऊन वापस मंद्र सप्तकातील कोमल धैवतावर





येऊन मंद्र सप्तकातील भरदार निषाद दाखवून षड्जावर स्थीर होते.दुसर्‍या ओळीतील "किसीकी याद आए"





यातील हळवेपणा, मध्य सप्तकातील निषादावरून मींड्ने मंद्र सप्तकातील धैवतावर येऊन दाखविण्याचा 




प्रयत्न केला आहे.अंतर्‍यामध्ये इतकी विविधता आहे...ती ऐकल्याशिवाय कळणार नाही.तेथे तोडी न






राहता,तोडीमध्ये नसलेला कोमल निषाद,शुद्ध गांधार इतक्या चपखलपणे येतो,की प्रत्येक शेर ऐकताना हे




काय गौडबंगाल आहे ते मतल्यावर येईपर्यंत कळत 


नाही...

Monday, June 1, 2015




घाव...


घाव ओला जरासा होता

वेदनेचा दिलासा होता


रात्र आली तशी गेली ही

चंद्र माझा फिकासा होता


शोध जेव्हा तुझा मी केला

गाव सारा सुनासा होता


सोबतीला कुणीही नव्हते

एक माझा उसासा होता


चार डोळे मुक्याने झरले

तोच सारा खुलासा होता


"काट्यांची मखमल"




|| शब्दसुधा ॥







संगीत आणि साहित्य :