गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, May 1, 2012

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

.महाराष्ट्रगीत...कुसुमाग्रज


हे शिवसुंदर समर शालिनी महाराष्ट्र माऊली
युगा युगांची जीवन  गंगा उदे तुझ्या पाऊली

मराठमोळी जमीन काळी सह्यगिरीचे कडे
सदाशिवाची चरण चाल यातून एकदा घडे
पायखुणांवर स्मरण मंदिरे इथे उभी राहिली

शिव हास्यासम मुक्त वाहते इकडे गोदावरी
ज्वारीसह समशेर पोसली कृष्णा तीरावरी
विसावली वर्धेवर अवघ्या दुनियेची सावली

भावभक्तीचे पुन्हा पुन्हा तुज अभिवादन भगवती 
तुझ्या पदावर नव्या युगाची,घडेल अमरावती
किरण क्रांतीचे दिसतील देवी,तुझ्याच उदयाचली


जय महाराष्ट्र ! जयहिंद !  






संगीत आणि साहित्य :