गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, April 9, 2013


मी सहसा कोणत्याही संमेलनास जात नाही.पण माझा (एक उनाड) विद्यार्थी संजय सिंगलवार याने आयोजित केलेल्या देखण्या अशा, महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोशिएशनच्या चौथ्या राज्य स्तरीय शब्द साहित्य सम्मेलनाचा (अलिबाग) आस्वाद घेऊन नुकताच परतलो...फेसबुकवरील मित्र-मैत्रीणींच्या सहवासाचाआनंद,साहित्य, चित्रकला,कविसम्मेलन,मुशायरा,चर्चा,मुलाखत,गप्पा,एकांकिका अशा अनेक विधांचा आनंद घेऊन एका कौटुंबिक वातावरणातून एकदम बाहेर निघणे थॊडे त्रासदायक झाले...पण पुन्हा लवकरच भेटण्याची आश्वासने मिळत गेल्याने सर्वजण स्वतःला सावरत,येते झाले.










संगीत आणि साहित्य :