मराठी गझल Live,S.M.Joshi,pune.2011
जीवनाचा खेळ रंगाया हवा
मांडलेला डाव मोडाया हवा
काळजाचे गीत मी गाऊ कसे ?
वेद्नेचा सूर लागाया हवा...
जीवघेण्या त्या निरोपाच्या क्षणी
हुंदका येईल,दाबाया हवा...
याचसाठी मी न काही बोललो
जो दिला तो शब्द पाळाया हवा...
जिंदगी ही शाप झाली इश्वरा
मृत्युचा उ:शाप तू द्याया हवा...
गायक - दिनेश अर्जुना,भैरवी कदम
गझल - दिलीप पांढरपट्टे
संगीत - सुधाकर कदम