गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, May 28, 2016

मराठी गझल गायक सुधाकर कदम :.. सुरेश गांजरे.. .दै.नागपूर पत्रिका,नागपूर.’विशेष पुरवणी’.१९८०

१९८० नंतर जन्मलेल्या मराठी गझलकार,गायकांनी हे अवश्य वाचावे...
     मराठी गझलांना स्वरबद्ध करून आपल्या सुरेल आवाजात सादर करण्याचा एक स्तुत्य उपक्रम गायक सुधाकर कदम यांनी सुरू केला आहे.विदर्भातील अनेक शहरात त्यांनी आजवर मराठी गझलांचे अनेक कार्यक्रम पेश कले आहे. महाराराष्ट्रातील गझलकारांच्या गझला सादर करणे….हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य असल्याने रसिकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे.
’दु भंगून जाता जाता मी अभंग झालो’
या सुरेश भटांच्या गीताने ते आपल्या कार्यक्रमाची सुरवात करतात.त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अप्रतिम गझला सादर होऊ लागतात.रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन आपल्या जीवाचे कान करून ऐकत असतात.
’मी गोड या स्वरांनी गातो जरी तराणे
गीतात हाय येती संदभ, जीवघेणे’
ही नीलकांत ढोलेची गझल…. ’
’आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही
आम्ही घरोघरी अन आम्हास गाव नाही’
ही शंकर बडेची गझल… ’
फुलवू नकोस आता उसने गुलाब गाली’
ही पुण्याच्या रमण रणदिवेची गझल रसिकांची उत्स्फुर्त दाद घेते.
श्री सुधाकर कदम हे संगीत विशारद असून आर्णी येथील महंत दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून नोकरी करतात.तेथेही त्यांनी ’गांधर्व संगीत विद्यालय’ सुरू करून आपली कलोपासना सुरूच ठेवली आहे. स्वतः कदम यांना शब्दांची चांगली ’जाण’ असल्याने ते शब्द व स्वर यांची उत्कृष्ट सांगड घालतात.प्रत्येक शब्दाला असलेला खास रुतबा सांभाळून पेश केल्याने त्याची खुमारी काही औरच असते.
सौ प्रभाताई मॅथ्यू व कु.रतन जोशी सुद्धा सुधाकर कदमांनी स्वरबद्ध केलेल्या गझला कार्यक्रमातून पेश करतात.तबलापटू श्री शेखर सरोदे यांच्या बोटाची जादू अप्रतिमच असते.अत्यंत परिश्रम घेऊन श्री कदम यांनी हा संच ग्रामीण भागातून उभारला,ही कौतूकाची बाब आहे.त्यांच्या शाळेचे व्यवस्थापक श्री राजकमलजी भारती व मुख्याध्यापक श्री बुटले गुरूजी यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभते.
हा ’गझल’चा कार्यक्रम कधी कधी अक्षरशः रात्र संपेपर्यंतही चालतो.विशेषतः स्वतः कदम
’पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली’
सु रेश भट…
’सखे,सांजवेळी नको दू र जाऊ’
अशा नाजू क,शृंगारिक रचना आपल्या मुलायम स्वरात खास ढंगाने सादर करून रसिकांची मने जिंकून घेतात.मधून मधून ते उर्दू गझलसुद्धा आपल्या खास चालींमध्ये उत्कृष्टपणे सादर करतात.
’मार्गावरून माझ्या मी एकटा निघालो’
ही उ.रा.गिरी यांची यांची गझल म्हणजे या कार्यक्रमाची भैरवी ! आपल्या आवाजातला तमाम दर्द ओतून सुधाकर कदम ती पेश करतात.क्षणभरासाठी रसिकांची मने हेलावून जातात.रसिकांच्या वृत्ती गलबलून काढण्याचे सामर्थ्य त्यांच्या स्वरात असते. सुरेल आवाजाची दैवी देण आणि कठोर परिश्रम….यामुळे अल्पावधीतच श्री कदम यांनी गझल गायनाच्या प्रांतात आपला चांगलाच जम बसविला आहे.एक नवा पायंडा ते पाडत आहे ही कौतूकाची बाब ठरावी.सुधाकर कदम यांना त्यांच्या या अंगीकृत कार्यात उदंड यश लाभॊ ! ग्रामीण कलावंताची ही प्रतिभा आनंददायी ठरो…ही अपेक्षा. 

No comments:





संगीत आणि साहित्य :