जे जे घडावयाचे ते ते घडून गेले
ठेवून या व्यथेला सुखही दुरून गेले
वावऱ्यासवे जुईचा आला सुगंध जेव्हा
केसात माळलेले गजरे स्मरून गेले
बेरंग जीवनाशी जुळले कधी न नाते
नाते जुळावयाचे वयही निघून गेले
तेव्हा तुझ्यासवे मी मस्तीत गात होतो
तू सोडले मला अन् स्वरही विरून गेले
गायक - सुरेश वाडकर
शब्द आणि संगीत - सुधाकर कदम
संगीत संयोजक - मिलिंद गुणे.
तबला - पांडुरंग पवार
संतूर - निनाद दैठणकर
व्हायोलिन - कल्याणी मुजुमदार
ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.
व्हिडीओ - विवेक काजरेकर




No comments:
Post a Comment