दूर गेल्या फुलांतल्या वाटा
ठेवुनी काळजात हा काटा
गुंतणे थांबवू म्हणाला तू
फोडला तूच आणखी फाटा
चिंब झाला जरी किनारा हा
कोरड्या राहिल्या तरी लाटा
दूर चाहुलही तुझी गेली
राहिला फक्त सुन्न सन्नाटा
गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे
शब्द - दिलीप पांढरपट्टे
संगीत - सुधाकर कदम
तबला - पांडुरंग पवार
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
गिटार - विशाल रामनगरिया
सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर
●Live - S.M.Joshi Sabhagruh, pune.




No comments:
Post a Comment