गझल या काव्य प्रकारामध्ये सर्वच विषय हाताळले जातात. परंतु गायकीच्या संदर्भात विचार केला तर प्रेम, दुःख, शृंगार, विरह वगैरे विषय असलेल्या गझला बहुतकरून गायिल्या गेल्यात व गायिल्या जात आहे.एवढेच नव्हे तर लोकप्रिय पण झालेल्या दिसतात .हे मराठी गझलच्या बाबतीतच नाही तर (एखादा अपवाद वगळता) उर्दू व इतर भाषिक गझलांमध्येही बघायला मिळते.
आज आपल्या समोर मुंबईचे गझलकार मनोहर रणपिसे यांची गझल सादर करीत आहे.आज ते आपल्यात नाहीत.पण ही गझल त्यांच्या हयातीतच स्वरबद्ध झाली होती.दुर्दैवाने ते असताना हे काम मी करू शकलो नाही याची खंत आहे.#सरगम_तुझ्याचसाठी या कार्यक्रमातून माझ्या मुली भैरवी व रेणू सादर करायच्या.
ही माझी खूप आवडती स्वररचना आहे.कारण ती शब्दांनी आणलेली आहे.शांत,संयत अशी ही गझल मयूर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे या दोघांनी युगल स्वरात तेवढ्यात संयत रीतीने भावपूर्ण गायिली आहे.
दुःखाशी नाते जडता जडता जडते
हे मैत्र अनोखे घडता घडता घडते
घुटमळत राहते फांदीवर स्वप्नांच्या
पाखरू प्रीतीचे उडता उडता उडते
डोळ्यात आसवे सहज कधी का येती
भरतीचे पाणी भरता भरता भरते
प्रेमात मनाच्या सुरेल जुळती तारा
हृदयास हृदय मग जुळता जुळता जुळते
संगीत संयोजन - मिलिंद गुणे #milindgune
ध्वनिमुद्रण व मिक्सिंग - पंचम स्टुडिओ,पुणे
मास्टरिंग - अजय अत्रे,पंचम.#ajayatre
तालवाद्ये - अपूर्व द्रविड #apurvdravid
व्हायोलिन - रुचिर इंगळे #ruchiringale
गिटार - राधिका अंतुरकर #radhikaanturkar
#mayurmahajan #prajaktasavarkarshinde
#sudhakarkadamscomposition #गझलगंधर्व #composition #marathi #music #संगीतकार #गझल #song #गीत #गीतकार #गझलकार




No comments:
Post a Comment