गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, December 29, 2025

काळोखाच्या तपोवनातून

 


.                                -आस्वाद-

         #काळोखाच्या_तपोवनातही_प्रकाशाची_वाट...


           मराठी साहित्यात आणि त्यातही गझलच्या प्रांतात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.ज्यांची शब्दसंपत्ती वाचकांना अंधाराच्या पायवाटे सोबत चालतांना प्रकाशाची उधळण करीत दिशा दाखवतील असा अनुभव सातत्याने मिळत राहतो.पुस्तक हाती पडल्यावर सुटत नाही असा सुधाकर कदम यांचा “ #काळोखाच्या_तपोवनातून ” हा 

काव्य संग्रह वाचताना वाचकांना आत्मभान देत जातो. सुधाकर कदम हे अवघ्या महाराष्ट्राला गझल संगीतबध्द करणारे  संगीतकार म्हणून माहीत असले तरी ते शब्दाचे पूजक आणि साधक आहेत.त्यांनी गझल,कविता,

विडंबनकार,गीतकार असा बराच प्रवास  केला आहे.त्यांचा हा संग्रह वाचतांना वाचकांना भावतरलता आणि त्याचवेळी त्यांचे जीवन चिंतनाचा अनुभव वाचायला मिळतो.माणसं माणसांपासून वर्तमानात दूर जाता आहेत.माणसांची नाती सैल होता आहेत.नात्यातही व्यवहार पाहिला जातो आहे.स्वार्थाच्या बाजारातील बंध अधिक घटट होत  असल्याने नाते विरळ होता आहेत.याचे कारण ती नाती हदयांसी बांधली गेलेली नाही हे वर्तमानातील वास्तव आहे.आपण जेव्हा हदयाशी नाते सांगत बंध निर्माण करतो तेव्हा त्याचा अनुभव वेगळाच असतो.

त्यातील अनुभूतीचा आंनदही अनुभवायला हवा आहे.ते  लिहितात...


 'कधी कुणाला अपुल्या हदयी वसवून बघ ना

 अजून काही नवीन नाती जुळवुन बघ ना...'


      खरेतर कविता,गझलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असताना अनेकदा कवी जीवन तत्वज्ञानाचे दर्शन घडवत असतो. अनेकदा समाजाचे वास्तव दर्शनही त्या शब्दांच्या माध्यमातून घडते . त्यासाठी कवी आपल्या जीवनाचे अनुभव,आपल्या भोवताल मध्ये जे काही दिसते तेही शब्दात नेमकेपणाने व्यक्त करीत वाचकांना आनंद आणि तत्वज्ञानाचे दर्शन घडवितांना दिसतात. वरवरच्या सौंदर्यांच्याला भाळत लोक त्याचे कौतूक करतील पण ते सौंदर्य ज्या काटयावरती टिकून आहे त्या काटयांच्या वाटयालाही दुःख आहेच.समाज व्यवस्थेतही सत्याच्या वाटेने जाणा-याच्या वाटयाला काटयासारखी उपेक्षा येत असते.आपण शेर समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर बरेच काही उलगडत जाते.त्यामुळे आपल्या भोवतालमध्ये जे काही दिसते आहे ते खेदाने व्यक्त करताना म्हणतात...


 'मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची

 काटयास मात्र येथे कसलाच ना निवारा...'


      गझल,कवितामधून प्रेम व्यक्त केले जाते. प्रत्येकाच्या तारूण्यात मनातील भावभावनांच्या  गंधीत आठवणी  असतातच.त्या काळात मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून  कविता आधार बनतात.तर वाचकांही तारूण्यातील प्रेमासाठी अनेकदा शेर उपयोगी पडत असतात. जीवन अनुभव घेऊन आपला प्रवास सुरू राहीला तर वय वाढत जाते पण मनातील भावना मात्र सतत ताज्या आणि टवटवीत असतात.त्या जुन्या आठवणीना आजही उजाळा देताना  कदम लिहितात...अर्थात हा अनुभव प्रत्येकाचाच असतो.आनंदाच्या आठवणी नेहमीच प्रसन्न असतात..


मनात माझ्या अजूनही तू तशीच आहे

फुलासारखी प्रसन्नताही तशीच आहे..


    माणसांच्या ढोंगीपणाचा कळसही आपल्या भोवतालमध्ये सातत्याने दिसत असतो.माणसं वरवर फारच देखावा करतात.वर्तनातील बाहय वर्तन बदलते .मात्र अंतरिक परीवर्तनाची कास असावी लागते ती हरवली जाते.माणसं बदलतात मात्र या बदलाने फार काही साधले जात नाही.अनेकदा भगवे वस्त्र अंगावर घेतले जात असले तरी वरून साधू बनता येईल पण त्या वस्त्राच्या आत असलेला त्याग आणि वैराग्य आतून यायला हवे असते.त्यामुळे वस्त्र परीधान करूनही भोगाची वृत्ती संपत नाही त्याबददल खंत समाजाला असतेच.असे सर्वच क्षेत्रात सुरू आहे..त्या देखाव्यावरती प्रहार करताना गाळ अंतरिच्या या गझलेत ते लिहितात...


 'भगव्यास पांघरूनी वरतून शुध्द झालो.

 पण गाळ अंतरीचा तो राहिला बिचारा...'


      माणसांचे जीवन खरेतर त्या एका नियती नावाच्या अनामिक शक्तीशी जोडलेले आहे.जीवन म्हणजे दुःखाचा सागर आहे हे संतानी वास्तव सांगितले आहेच.मात्र तरी जीवन रूपी चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागतो.त्यातून सुटका करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यावर मात करणे होत नाही.जे संचिती असते ते भोगावेच लागते.कारण नियती जोखडून ठेवत असते..त्या संदर्भाने कवी लिहितात...


'आयुष्याच्या चक्रव्यूहातून कधीच सुटका नसते.

नियती त्याला दळण्यासाठी खुंटा मारून बसते...'


      जीवनात दुःख सामावलेले आहे.ते दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने माणसं करीत असतात.अशा परीस्थितीत वास्तवाचा स्वीकार करीत त्यावर मात करण्याची गरज आहे.मात्र या कालचक्रातील या वर्तूळात हे घडत राहाणार आहे त्याला आपण का भ्यावे ? त्याला सामोरे जाताना आपण अधिक आंनदाने प्रवास करायला हवा.त्याकरीता मानवी जीवनात हास्य हा महत्वाचा उपाय आहे.माणसांने सतत हसत रहावे आणि त्याच बरोबर इतरांना हास्य देत रहावे हे जीवनसूत्र पाळत गेलो तर बरेच प्रश्न सुटू शकतात म्हणून कवी लिहितात...


 'हासुनी हसवायचा हा मंत्र घे

 दुःख का कुरवाळतो तू सांग ना!'


      आपण जीवनात सुख दुःखाचा अनुभव घेत असतो.त्या अनुभवात हसणे आणि रडणे या नैसर्गिक क्रीया घडत असतात.खरेतर जीवनात कोणताही अनुभव आला तरी त्या परीस्थितीत आपले आपणच जगत असतो.हा सारा अनुभव आपला व्यक्तीगत असतो.त्यामुळे या काळात आपण स्वतःला समजावत दुःखाच्या काळात सुखाने फुलता यायला हवे.अर्थात आपण जीवनाकडे कसे पाहतो याला अधिक महत्व आहे.त्यामुळे वाचकांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलावे म्हणून ते म्हणतात...


'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे

असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे...


      जीवनात माणसांने आपला प्रवास कसा सुरू ठेवायचा यामागे प्रत्येकाचे असे काही तत्वज्ञान असू शकते.जीवन अनुभव भिन्न असले तरी अनेकदा दुःखावर मात करण्यासाठी असलेले मार्ग समान असू शकतात.त्या संदर्भाने कवी वाचकांना काही सांगू पाहता आहेत.त्याच बरोबर आपला अध्यात्मिक प्रवास हा देखील मुक्तीसाठी असतो.ती मुक्ती प्राप्त करण्यासाठी लोक कितीतरी विविध मार्गाने प्रयत्न करतात.मात्र कवी मुक्तीचा साधा सोपा उपाय सांगता आहेत.कवी त्यासाठी अभंग या प्रकारात उपदेश करतांना लिहितात


 'दीन दुःखितांना / मदत जे करी

 तेणे मुक्ती चारी / साधलिया...'


      माणसं जीवनभर आपला प्रवास सुरू ठेवताना तो सुखाचा व्हावा म्हणून  एका शक्तीमान असलेल्या निर्मिकाची प्रार्थना करीत असतात.ती प्रार्थना प्रत्येक धर्माची व्यक्ती करीत असते.आपला देव वेगळा असला तरी त्याचेकडे मागणे एकच आहे.ते मागणे जीवनशुध्दी आणि जीवनातील दुःख कमी करण्यासाठी असते.जीवनातील दुःखाचे मुळ कारण केवळ तृष्णा आहे हे कवीला माहित आहे.आपली जीवनातील तृष्णा संपली , की जीवनानंदाचा प्रवास सुरू होईल म्हणून ते अज्ञाताची हाक या कवितेत लिहितात..


 'कोणाचिही करा / एकत्र प्रार्थना

 मिटवाया तृष्णा / निरागस...'


       जीवनाच्या वास्तवाचे दर्शन अनेकदा काव्यातून वाचकांना होत असते.आपण जीवनभर आपले आपले असे करत जगतोच.स्वार्थाच्या पलिकडचा प्रवास तसा फारसा होत नाही.अशा परीस्थितीत आपण बरेच काही गमावत असतो.त्या गमविण्याची चिंता आयुष्याच्या शेवटी लागते.अशा परीस्थितीत जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जीवनाच्या वास्तवाचे दर्शन घडते.जीवनाचा प्रवास प्रत्येकाला एकटयालाच करायचा आहे.सोबत कोणीच नसते अखेरच्याक्षणी..मात्र ही जाणीव आयुष्यात होत नाही..जीवनाचे वास्तव दर्शित करताना कवी सांगू पाहाता आहेत.


 'सरणावरती चढतो जेव्हा

 कोणी नसते त्याच्या पाठी'


      आपल्या भोवती जे काही दिसते त्याच्या वेदना साहित्यातून येण्याची गरज असते.साहित्य हे अनुभवाची मांडणी असते.त्या अनुभवाच्या शिवाय येणारे साहित्य हे वाचकांच्या अंतकरणाला स्पर्श करू शकणार नाही.मात्र अलिकडे साहित्यातही बरेच काही घडते आहे.साहित्यातील वास्तवाचे दर्शन ते घडवितात.आपण गरीबीच्या वेदना पोटभर आहार घेऊन मांडल्याने त्यातून त्या साहित्यातून फार काही परीवर्तन घडण्याची शक्यता नाही.अनुभव शुन्यतेची मांडणी समाज परीवर्तन करू शकणार नाही.ही जाणीव निर्मळ अंतकरणाच्या लेखकाला असते म्हणून कवी ती सल मांडताना लिहितात


'ए.सी.त बसोनी / शेतक-यावरी

 लिही कांदबरी / मुंबईत...'


      माणसं ढोंगीपणाने वागत असतात ,त्या ढोंगीपणावर केलेला प्रहार अनेकदा वाचताना मिळतोच.समाजातील या वास्तवाचे निरिक्षण करीत असताना ,त्यांना काय म्हणावे  ? असे प्रश्न पडतो तेव्हा कवी अत्यंत सोप्या भाषेत त्याची उत्तरे देऊ पाहाता आहेत.उत्तम समाजाची निर्मिती हे प्रत्येक चांगल्या माणसांचे स्वप्न असते.त्या प्रवासात चांगली माणसं कोणती याची उत्तरे आपल्याला मिळत जातात..कवी काही माणसांची लक्षणे नमूद करतात..ते लिहितात..


 'ज्याच्या तोंडामध्ये / तंबाखू नि बिडी

 तयासी पाखंडी / म्हणावे गा...'


      व्यसनापासून मुक्त असलेला समाज हा नेहमीच चांगल्या समाजाचे लक्षण आहे.या कविता संग्रहात कधी गझल , कधी अंभग ,कधी  निव्वळ कविता अनुभवायला मिळते.शब्दाचा फुलोरा न करता जीवन तत्वज्ञानाचे दर्शन या संग्रहात घडते.अत्यंत सुक्ष्म निरिक्षणही आपल्याला अनुभवायला मिळते.संगीत साधनेने जीवनाला मिळालेला आंनदाचा मार्गही अनुभवता येतो.कविता संग्रह अत्यंत वाचनीय झाला आहे.कविता संग्रहाचे अविनाश वानखेडे यांचे मुखपृष्ठही वाचकांना चिंतन करण्यास भाग पाडते.


◆ काव्य संग्रह : काळोखाच्या तपोवनातून

◆ कवी : गझलगंधर्व सुधाकर कदम #sudhakarkadam 

◆ प्रस्तावना : डॉ. राम पंडित #rampandit 

◆ मुखपृष्ठ : डॉ. अविनाश वानखडे #avinashwankhade 

◆ प्रकाशक : स्वयं प्रकाशन मो. 8888769659

◆पाने : ९६

◆मूल्य : १५० ₹


-संदीप वाकचौरे #sandipwakchaure 


संग्रह मिळवण्यासाठी तपशील -

किंमत रु. १५० + टपालखर्च ५० 

● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.

A/c no : 053312100004140

IFSE Code : BKID0000533



बँक ऑफ इंडिया,पुणे.

google pay - 8888858850

Friday, December 26, 2025

माझी शब्द स्वरसंपदा

                       


आजमितीस माझ्या नावावर लेखक/कवी/संगीतकार म्हणून 

#फडे_मधुर_खावया…  (नागपूरच्या दै.तरुण भारत वर्तमानपत्रामधील 'विषयांयर' या सदरातील खुसखुशीत स्फूट लेख).

#सरगम  (शालेय गीतांची स्वरलिपी).

#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा  व 

#काळोखाच्या_तपोवनातून  (काव्य संग्रह) अशी चार पुस्तके,तसेच 

#भरारी  (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट). 

#अर्चना  (भक्तिगीते), गायक-पं. शौनक अभिषेकी, अनुराधा मराठे.(टी सिरीज).

#खूप_मजा_करू  (बालगीते),(फाऊंटॆन म्युझिक कं), #काट्यांची_मखमल पहिला युगल गझलांचा अल्बम. गायक-पद्मश्री सुरेश वाडकर,वैशाली माडे.(युनिव्हर्सल म्युझिक कं). 

#तुझ्यासाठीच_मी...(मराठी गझल),गायिका-वैशाली माडे, ( युनिव्हर्सल म्युझिक कं).

#काट्यास_फूल_आले ....(मराठी गझल),गायक-मयूर महाजन, प्राजक्ता सावरकर शिंदे,गायत्री गायकवाड गुल्हाने.

#रे_मना...(मराठी गीत/गझल),गायक-मयूर महाजन,

प्राजक्ता सावरकर शिंदे.

 ह्या कॅसेट्स सीडीज (अल्बम) सोबतच #सुरेश_वाडकर, #मयूर_महाजन,#प्राजक्ता_सावरकर_शिंदे,#गायत्री_गायकवाड_गुल्हाने,#सावनी_सावरकर,#कल्पिता_उपासनी यांच्या आवाजात नव्याने स्वरबद्ध केलेली मराठी व उर्दू गीते/गझला युट्युब,स्पॉटिफाय या सारख्या विविध ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

वाडकरांच्या सौभाग्यवती #पद्मा_सुरेश_वाडकर व मुलगी #अनन्या_सुरेश_वाडकर यांच्या आवाजात हनीफ़ साग़रांच्या दोन उर्दू गझला नुकत्याच ध्वनिमुद्रित केल्या आहेत.येत्या महिनाभरात आपणास ऐकायला मिळतील.


        मी स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्द गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे, वैशाली माडे, नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन, प्राजक्ता सावरकर शिंदे,गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, डॉ.सुशील देशपांडे,आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे,मोहन भिवरकर सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,

रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी मी स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहे,गात आहेत.


       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत बापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,

वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊत,इलाही 

जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप 

पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोशी,म.भा.चव्हाण.

रमण रणदिवे,सदानंद डबीर,ज्योती बालिगा राव,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,

मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,

बदिउज्जमा बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,

प्रमोद खराडॆ,जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल 

राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,

मीरा सिरसमकर,रविप्रकाश चापके,राज यावलीकर,

किरण पिंपळशेंडे,चंदना सोमाणी,डॉ.रामदास चवरे,

धुमाळ पिता-पुत्र,संदीप गावंडे व दस्तुरखुद्द अस्मादिकही आहेत.


        उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, हनीफ़ साग़र ,इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), बशर नवाज़,मौलाना तारिक जमील,डॉ.दिलीप पांढरपट्टे, कलीम खान,प्रथम गिरीधारी,अनंत नांदूरकर या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध केल्या आहेत....

-----------------------------------------------

.                 #युट्यूब्वर_उपलब्धअसलेल्या_रचना


#मराठी_गझल

१.कुठलेच फूल आता -सुरेश भट

२.दिवस है जाती कसे -      "

३.झिंगतो मी कळेना-         "

४.जगत मी आलो असा की- "

५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"

६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "

७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "

८.ही न मंजूर वाटचाल-        "

९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"

१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत

११.दुःख माझे देव झाले-   "

१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे

१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "

१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "

१५.गाऊ नये कुणीही-                     "

१६.घाव ओला जरासा होता-            "

१७.हसू उमटले दुःख भोगता-           "

१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "

१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "

२०.तराणे-                                     "

२१.येता येता गेला पाऊस-                "

२२.किती सावरावे-                          "

२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार

२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी

२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे

२६.मी करू सारखा विचार किती-        "

२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने

२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर

२९.पियानो-उ.रा.गिरी

३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख

३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर

३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट

३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे

३४.रानात पाखरांची-म.भा.चव्हाण

३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे

३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे

३७.गझल चांदण्यांची-समीर चव्हाण

३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे

३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत

४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु

४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे

४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार

४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके

४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट

४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट

४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर

४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण

५०. जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे

५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

५२.माझी गझल गुलबो-रविप्रकाश चापके

५३.मला सोसवेना दुरावा तुझा-         "

५४.जळलो धुपापरी मी-                  "

५५.प्रतीक्षा पार्थना झाली-                "

५६.काट्यास फूलआले -                  "

५७.जो तो दिसावयाला दिसतो सुखात "

५७.असे पत्र आता तुला मी लिहावे-    "

५८.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

५९. राखून रीत आले-ज्योती बालिगा राव

६०. तुझे तुला जगायचे-सुधाकर कदम

६१. मज गायचेच आहे-          "

६२. संपली अजुनी कुठे ही रात सजणा-म.भा.चव्हाण

६४. ये न ये टिपूरसे चांदणे-ज्योती बालिगा राव

६५.वेदनेचा सूर-सुधाकर कदम

६६. एकटीच मी निवांत भैरवी बसेन गात-

६७.डोळे-बबन धुमाळ

६८. या नवा सूर्य आणू चला यार हो-सुरेश भट

६९. रात गेली निघून पाऱ्याची-            "

७०.हा असा चंद्र अशी रात-                 "

७१. उमलून मी येऊ कशी-ज्योती बालिगा राव

७२. जे जे घडवयाचे ते ते घडून गेले-सुधाकर कदम

७३. जीव जडला प्रिये-प्रसन्नकुमार धुमाळ

७४. सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-सुधाकर कदम

७५. उदंड ओसंडुनी कधी वावरता आले-शिवाजी जवरे

७६. एक भक्तिभाव आहे-मीनाक्षी गोरंटीवर

७७. शेवटी हे दुःख माझे -ज्योती बालिगा राव

७८. लिहावे किती मीच माझ्या मनावर-किरण पिंपळशेंडे

७९. चंद्र ताऱ्यात चर्चा अशी रातभर-घनश्याम धेंडे

८०. किती रुंजी तरी तिथल्या तिथे-समीर चव्हाण

८१. तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले-दिलीप पांढरपट्टे

८२. आसवांना टाळणे आता नको-                  "

८३.असेच जगलो झुगारले या जगास-              "

८४. प्रेम अपुले नवे नवे होते-                           "

८५. नुसत्याच तुझ्या हसण्याने-                         "

८६. आसवांना टाळणे आता नको-                    "

८७. कवटाळलेस तेव्हा अन् टाळतेस आता-        "

८८. कळे ना मला हा कसा नेमका तू-                 "

८९. दुपट्टा घसरणे-गंगाधर मुटे

९०.दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

९१.शब्दांनाही सूर भेटता... चंदना सोमाणी


#मराठी_गीते


१.गीत गंगेच्या तटावर-सुरेश भट

२.पहाटे पहाटे-                "

३.मी असा आहे कलंदर-    "

४.गे मायभू-                     "

५.तसे किती काटे रुतले-     "

६.भरात आला श्रावण महीना-ग.दि.माडगुळकर

७.झोपडीच्या झापाम्होरं-                 "

८.महाराष्ट्रगीत-कुसुमाग्रज

९.पोवाडा-शाहीर अण्णा भाऊ साठे

१०.सरस्वतीची भूपाळी-गोविंद

११.सकाळ-उ.रा.गिरी

१२.मराठी हजल-शिवजी जवरे

१३.मन-बहिणाबाई

१४.मानवांनो आत या रे-विंदा करंदीकर

१५.घोडा (बालगीत) शांता शेळके

१६.जवळ येता तुझ्या-अनिल कांबळे

१७.झिंगले चांदणे-श्रीकृष्ण राउत

१८.मराठी माहिया-घनश्याम धेण्डे

१९.सांगू कशी राया तुले (वऱ्हाडी गीत) शंकर बडे

२०.श्याम घन घनश्याम-आशा पांडे

२१.ये मंत्राची घुमवित वीणा-   "

२२.शक्ती दे तू आज मजला-   "

२३.दयासागरा-                      "

२४.तुझीच सुमने-                   "

२५.करुणा अपार आहे-           "

२६.वेद झाले वेदनांचे-              "

२७.तूच माझे गीत कोमल-         "

२८.सरगम तुझ्याचसाठी-सुधाकर कदम

२९.पावसात जाऊ-मीरा सिरसमकर

३०.बारीकराव-                    "

३१.रिमझिम पाऊस-            "

३२.हिरवे हिरवे गर्द चिमुकले- "

३३.बागेतल्या फुलांशी मैत्री-   "

३४.रानातले पक्षी-                 "

३५.थेंब-                              "

३६.इवलसं बी-                     "

३७.खूप मजा करू-                "

३८.उठ उठ सह्याद्रे

३९.आभाळ वाजलं

४०.पीक खुशीत डोलतय सारं

४१.राम कृष्ण हरी-विश्वनाथ स्वामी

४२.चतुर्वेद जैसा तानपुरा बोले-गंगाधर महांबरे

४३.घर अपुले बांधू आपण-गजेश तोंडरे

४४.रे मना तुज काय झाले सांग ना-सुधाकर कदम

४५.काकडारतीच्या वेळी मन होतसे चकोर- "

४६.हा भाव-भावनांचा चालूय खेळ सारा-    "

४७.स्पर्शून एकदा तू केले मला ययाती-       "

४८.कशी वेदना विसरायाची सांग मला तू-   "

४९.जीवनाची एकतारी-                           "

५०.आर्त गाण्यातून फुलता एक नात्याची कहाणी "

५१.माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे-आशा पांडे

५३.काय होते या मनाला सांजवेळी-सुधाकर कदम

५४. मज कळले तू माझी-उ.रा. गिरी

५५.तुझी सुवर्णाची आभा-डॉ.रामदास चवरे

५६. तू दिलेले दुःख आहे प्राण माझा -राज यावलीकर

५७. ध्यास लागलासे मजला विठू माऊलीचा-       "

५८. जेव्हा मला कळेना तुझिया मनातले-संदीप गावंडे

५९- संध्येच्या शामल डोही-श्रद्धा पराते

६०. मन माझे-समीर चव्हाण

६१.  पाऊस असा घनघोर,नदीला पूर-अनिल कांबळे

६२. गुरू मायबाप,गुरू रूप संत-

६३. आभाळाचे गर्द निळेपण-गजेश तोंडरे


#उर्दू_ग़ज़ल


१.आग जो दिल में लगी है-हनीफ़ साग़र

२.दिल लगाया है तो नफरत-     "

३.न इस तऱ्हा भी खयालों मे-बशर नवाज़

४.यकायक चांदनी चमकी-दिलीप पांढरपट्टे

५.गयी लज्जत पिलाने की-         "

६.तू मेरी दुश्मन नहीं-कलीम खान

७.तुम्हारे हुस्न में जो सादगी है-हनीफ़ साग़र 

८.मैं झुकाऊं सर कहीं भी-           "

९.सब में रहकर भी जुदा लगता है तू-   "

१०.बारहा हम जो मुस्कुराए है-प्रथम गिरीधारी

११.कल जो अपने थे अब पराए है-बेताब अलीपुरी

१२.ना सही लब न खोलिए साहब-हनीफ़ साग़र 

१३.उनकी गलियों से उठाई है ग़ज़ल-अशोक अंजुम

१४.जब मेरी नजर आपके चेहरे पे पडी है-हनीफ़ साग़र 

१५.इतना मुझे चाहा करो ना-समीर चव्हाण

१७. मै के तनहाई की चादर तानकर-हनीफ़ साग़र 

१८. ये कैसी शाम है-दिलीप पांढरपट्टे

१९.दिन लगे है रात सा-        "

२०.देखते ही देखते ये क्या नजारा हो गया-    "

२१. जोगी,आवारा,मुसफिर बन गये-हनीफ़ साग़र 

२२. उस के मुह से झूट सच्चाई लगे-अनंत नांदूरकर

२३. फिर तेरी याद लौट आयी है-दिलीप पांढरपट्टे

२४. मेरी उम्रभर का रियाज़ था-मौलाना तारिक जमील

२५.कैसे कैसे लोग-बशर नवाज़

----------------------------------------------------

#हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रसिद्ध होणाऱ्या संगीतास वाहिलेल्या भारतातील एकमेव #संगीत या मासिकातील '#नग़्म_ए_ग़ज़ल' आणि '#प्रसार_गीत' या स्तंभांतर्गत प्रकाशित गझल गीतांची यादी...


#उर्दू_ग़ज़ल


१.

छोटी सी बात की मुझे...अशोक अंजुम...जुलाई १९८६

२.

पत्थरों के शहर में....         "                 नवम्बर १९८६

३.

इतने करीब मेरे...        मोहन वर्मा 'साहिल'  मार्च  १९९०

४.

किसीका क्या भरोसा है...बेदील हाथरसी.   अप्रैल १९९० 

५.

कोई बात बने...             श.न.तरन्नुम ...       मई  १९९०

६.

मत पुछिए...                  शेरजंग गर्ग...    जुलाई १९९०

७.

दूर से आए थे साक़ी.नजीर 'अकबराबादी' अक्तूबर१९९०

८.

वक़्त से पूछ लो...डॉ.राही मासुम रज़ा...     मार्च  १९९१

९.

उनकी गलियों से....अशोक अंजुम...         अप्रैल १९९१

१०.

ग़म को सीने से लगाकर...'राग' कानपुरी...  जून  १९९१

११.

आज सदीयों की घनी...कलीम खान...        जून १९९२

१२.

जलाए जब तुम्हे शबनम...   "                 सितंबर १९९२

१३.

आदमी गुज़रता है...किरन भारती...        अक्तूबर १९९२

१४.

हमने पाया है तुम्हे...श्रद्धा पराते...                मई १९९३

१५.

हसीन चांद नहीं...'मयंक'अकबराबादी...    नवंबर १९९३

१६.

करीब मौत खडी है...सैफुद्दीन सैफ़ ...      अक्तूबर १९९३

१७.

ज़ख्म-ए-दिल...प्रताप सोमवंशी...                मई १९९४

१८.

बद्दुआ भी...नित्यानंद 'तुषार'...               सितंबर १९९५

१९.

चाक दामां है...अल्लाम 'खिजर'...          अक्तूबर १९९५

२०.

चाह थी इस दिल से...यश खन्ना 'नीर'...    दिसंबर १९९५

२१.

तेरे आगे कली की नाज़ुकी...कमलप्रसाद...  मार्च १९९६

२२.

आग़ाज़ तो होता है...मीनाकुमारी...          अगस्त १९९६

२३.

वो शख़्स जाते जाते...डॉ.पूर्णिमा 'पूनम'..सितंबर १९९७


#गीत


१.

अमर रहे स्वातंत्र्य... नर्मदाप्रसाद खरे...     अगस्त १९८६

२.

जय जय भारती... वल्लभेश दिवाकर...    अगस्त १९९०

३.

गदराई उमरिया...शंकर दीक्षित...             अप्रैल १९९१

४.

तुम साज़ प्रिये...वेदमणिसिंह ठाकूर...           मई १९९१

५.

दरशन देना नंददुलारे... कृपालू महाराज...    जून १९९१

६.

रखता उंची शान तिरंगा....हरीश निगम...  अगस्त १९९१

७.

उम्र पल पल ... श्रद्धा पराते...                अक्तूबर १९९१

८.

जय स्वरदायिनी...कृष्णराव भट्ट 'सरस'...      मार्च १९९२

९.

परमेश आनंद धाम हो...पथिक...             अप्रैल १९९२

१०.

ये बरखा की रुत... शामकृष्ण वर्मा...        जुलाई १९९२

११.

सह्यो न जाय...श्रद्धा पराते...                 अक्तूबर १९९२

१२.

ओस की बुंदे...डॉ.राही मासुम रज़ा...        नवंबर १९९२

१३.

अर्चना तुम,वंदना तुम....रवि शुक्ल...       दिसंबर १९९२

१४.

देह हुई सरगम सी...राजनारायण चौधरू.. दिसंबर १९९२

१५.

चांद सूरज एक है...माया भट्टाचार्य...            मई १९९३

१६.

सतरूप प्रभो अपना... पथिक...                  जून १९९३   

१७.

राष्ट्र आराधन... डॉ.विश्वनाथ शुक्ल...      सितंबर १९९३

१८.

तू दयालू दीन मैं... तुलसीदास...             सितंबर १९९३

१९.

गाईए गणपती जग वंदन...तुलसीदास...  अक्तूबर १९९३

२०.

ज्योति तुम,मैं वर्तिका हूँ... डॉ.रंजना...      नवंबर २९९३

२१.

गीत मैं ने रचे...शंकर सुलतानपुरी...            मार्च १९९४

२२.

ऐसा भी देखा है...प्रभा ठाकूर...                अप्रैल १९९५

२३.

जब यौवन मुसकाता है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मई १९९४

२४.

राम नाम जपना... डॉ.प्यारेलाल श्रीमाल...    जून १९९४

२५.

तुमने लिखी न पाती...श्रद्धा पराते...         अगस्त १९९४

२६.

आंख से ओझल तुम हो...विनू महेंद्र...     अक्तूबर १९९४

२७.

उड रे पखेरू  ...शाह हुसेन...                  दिसंबर १९९४

२८.

वह गीत फिर सुना दो.डॉ.विश्वनाथ शुक्ल.अक्तूबर १९९५

२९.

तनहाई मेरे साथ तो है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मार्च १९९६

३०.

रात का पथ... मधुर शास्त्री...                       मई १९९६

३१.

पपिहा की बोली...सियाराम शर्मा 'विकल'..जुलाई १९९६

३२.

पी ले रे अवधू हो मतवाला...चरणदास...सितंबर १९९६

-------------------------------------------------------------------

●ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२२ मधील स्वररचना...(फेसबुक)


१.तुझे माझ्याजवळ असणे सुखद होते-विद्या देशपांडे

२.प्रेम होते कसे स्वप्न पडते कसे-संजय गोरडे

३.एखाद्या दुपारवेळी मी खिन्न एकटा असतो-प्रियंका गिरी

४.जे जे मला मिळाले साभार देत आहे-आशा पांडे

५.डोळ्यात आसवांना मी आणणार नाही-डॉ.मनोज सोनोने

६.भेटून काय सांगू माझी व्यथा कुणाला-अनिल जाधव

७.तुझ्या माझ्यातला आता दुरावा वाढतो आहे-कविकुमार

८.केवढे झाले सहज जाणे तुझे-शरद काळे

९.नेहमी तुझ्याच आसपास मी-अश्विनी बोंडे

१०.ओठात नाव येता सांजावला शहारा-साईनाथ फुसे

११.अशा सांजवेळी दिवेलागणीला-सविता बन्सोड

१२.दिवस येतो दिवस जातो-डॉ.अविनाश सांगोलेकर

१३.वंचना जखमा जुन्या उसवून येते-अमिता गोसावी

१५.कुणीच नसले सोबतीस की घुसमट होते-सचिन साताळकर

१६.आपण सारे इथे बुडबुडे-अशोक कुलकर्णी

१७.दुःखात का जीवाला झुरवत बसायचे-गौरी शिरसाट 

१८.एकरूप व्हायचे, प्रेमगीत गायचे-दीपाली वझे

१९.पुन्हा थांबेन जर ती यायची आहे-स्मिता गोरंटीवार

२०.झिजल्याशिवाय दरवळ नाही-मीनाक्षी गोरंटीवार

२१.दिशा शृंगारल्या होत्या हवा गंधाळली होती-प्रशांत वैद्य

२२.झाल्या चुका असू दे रस्ता नवा धरू या-प्रतिभा सराफ

२३.दुःख माझे दूर करण्या धावते माझी गझल-प्रसन्नकुमार धुमाळ 

२४.सांग तुजला काय आता आठवाया लागले-सुधाकर इनामदार

२५.ऐक ना! बोलायचे राहून गेले-निर्मला सोनी

२६.कुठे कुणाची सोबत पुरते आयुष्याला-अल्पना देशमुख नायक

२७.भकास झाले हसरे अंगण तू गेल्यावर-मसूद पटेल

२८.हळूच बोलणे तुझे तसे हळूच हासणे-हेमंत जाधव 

२९.तुला उगाच वाटते तुझ्याविना मरेन मी-दिवाकर जोशी

३०.मी तरी आता व्यथांचे पांघरू शेले किती-वंदना पाटील वैराळकर

३१.मिठीत तुझिया येउन झाला निवांत वारा-डॉ.संगीता म्हसकर

३२.दुःख माझे तुला पण कळू लागले-भैय्या पेठकर

३३.अचानक जीभ ही अडते-अनिल पाटील 

३४.सांजकोवळी क्षितिजावरती-संजय इंगळे तिगावकर

३५.उदास झाले हसरे अंगण-व्यंकटेश कुलकर्णी

३६.केलेत केवढे तू उपकार काय सांगू-श्रीराम गिरी

३७.पुन्हा का तेच ते होते-कीर्ती वैराळकर

३८.तुझ्यावर भाळलेल्या वेदनांचे काय मग?-अंजली पंडित दीक्षित

३९.ओठी जरी कधीचे स्वातंत्र्यगान आहे-म्.भा.चव्हाण

४०.संध्येच्या शामल डोही-श्रद्धा पराते

४१.दूर तिथे घन बरसे हलकासा-सदानंद डबीर

४२.दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

४३.रात गेली निघून पाऱ्याची-सुरेश भट

४४.मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर-उ.रा.गिरी

४५.आदिशक्ती तू,आई रेणुके-निलकृष्ण देशपांडे

४६.घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली-शिवा राऊत 

४७.भेटली तू मला वादळासारखी-श्रीकृष्ण राऊत 

४८.सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-सुधाकर कदम

४९.तुमने किया है प्यार-डॉ.प्यारेलाल श्रीमाल

५०.जो भी तेरी गली में आता है-हनीफ़ साग़र

५१.इल्म ऐसा वो सीखकर आया-अमित झा राही

५२.शाम होते ही सितारे भी चमक जाते है-सुधीर बल्लेवर 'मलंग'

५३.हो अगर दिल में उजाले तो ग़ज़ल होती है-एजाज़ शेख

५४.दिल तो टूटा है दिल लगाने से-उमाशंकर

Monday, December 15, 2025

माझेच गीत आले ...


     


या गझलच्या बंदिशचा बेस तसा #मधुवंती​ राग आहे.दादरा तालातील ही बंदिश शेवटच्या म्हणजे सहाव्या मात्रेपासून सुरू होते.सुरवातीच्याच 'काही' या शब्दातील 'का' या अक्षरावरील खटका ऐकणाऱ्यास आकर्षित करून घेतो.दुसरा मिसऱ्यातील 'माझेच गीत आले' यातील 'आले' या शब्दाला घेऊन तार रिषभावरून कोमल गांधारपर्यंत उतरतानाच्या सुरावटीत मधुवंतीमध्ये नसलेला कोमल (शुद्ध) 'मध्यम' आल्यामुळे शब्दासोबतच सुरावटही चमत्कृतीपूर्ण झाली आहे,तसेच 'पाळीत रीत आहे' या ओळीतील 'रीत' या शब्दावर कुठे कुठे कोमल मध्यम घेतल्यामुळे 'पटदीप' रागाचा पण भास होतो.

पहिल्या आणि तिसऱ्या शेरात कोमल धैवतही अचानक हजेरी लावून गेल्यामुळे शेरांची रंगत वाढली आहे.दुसऱ्या शेरातील #मैफिलीचा​ शब्दावरील  वेगवेळ्या सुरावटी मूळ मधुवंती बाजूलाच ठेवतो.तरी पण पूर्ण बंदिश मधुवंतीच्या आसपास रुंजी घालताना दिसून येते.

【धून तयार झाल्यानंतरच हे विश्लेषण आहे.धून तयार होताना कोणत्या 'धुनकीत' असतो ते मलाही कळत नाही 😊.】

                   गझल

काहीं न बोलण्याची राखून रीत आले

माझ्या समोर आता माझेच गीत आले. 


एकेक घाव माझा आता भरून येई

हे कोण चांदण्याचे टाके भरीत आले


केलास का असा तू बेरंग मैफिलीचा

आता कुठे जराशी मीही लयीत आले


सांगू कशी तुला मी आले कुठून येथे

आताच मी उन्हाच्या ओल्या सरीत आले


ज्याने दिला नशेचा हाती हळूच प्याला

आयुष्य ते मलाही आकंठ पीत आले

                         ■

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड).सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.


दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.

कलंदर


 

Saturday, December 13, 2025

यवतमाळची शकुंतला

 .                        #जगत_मी_आलो_असा                                                           लेखांक ८                   

      शीर्षक वाचून तुम्हाला दुष्यंताची शकुंतला आठवली असेल.ती ही शकुंतला नाही.ही आमची यवतमाळची 'आगीनगाडी' होय.रंभेच्या मुलीचे रक्षण शकुन पक्षाने केले म्हणून दुष्यंताच्या शकुंतलेचे नाव शकुंतला पडले.काही काळ दुष्यंताला  शकुंतलेचा विसर पडला होता ही कथा सुद्धा आपणास माहीत असेलच.अशी ही शकुंतला  पुराणात वर्णन केल्याप्रमाणे सुस्वरूप,देखणी कण्व ऋषींच्या आश्रमात वाढलेली वगैरे वगैरे... पण जिला रंग ना रूप अशा यवतमाळच्या 'यवतमाळ ते मूर्तिजापूर' चालणाऱ्या छोट्या (नॅरो गेज) आगीनगाडीला (आगीनगाडी कसली ढक्कलगाडी म्हटले तरी चालेल.) शकुंतला हे सुंदर नाव देणाऱ्या यवतमाळकर रसिकास दाद द्यावी लागेल.ही गाडी इंग्रजांच्या काळात क्लिक निक्सन अँड कंपनीच्या माध्यमातून २५ डिसेंबर १९०३ मध्ये जिल्ह्यातील कापूस इंग्लंडमधील मँचेस्टरला पोहोचवण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली होती. यवतमाळ रेल्वे स्टेशनचा कोड आहे ytl. येथे दोन प्लॅटफॉर्म आहेत.पण विना शेड! (सध्या नवीन रेल्वे स्टेशनचे काम सुरू असल्याचे  कळते.खरे खोटे सरकारला माहीत.)


     तर मित्रहो, ही गोष्ट आहे १९६५ ते १९७० च्या दरम्यानची.बोरी अरब जवळील लाडखेड येथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. लाडखेड हे यवतमाळ मूर्तिजापूर रेल्वे मार्गावर असल्यामुळे सर्व लवाजमा घेऊन 'शकुंतले'ने लाडखेडला गेलो.त्यावेळी शकुंतलेला वाफेचे इंजिन होते.कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी शकुंतलेनेच यवतमाळला निघालो. यवतमाळ जवळच्या लोहारा या गावापर्यंत आल्यावर गाडी आचके देत थांबली.ती सुरूच होईना.चौकशीअंती (ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार) बॉयलर थंड झाल्याचे कळले.बऱ्याच प्रयत्नानंतर अर्ध्या तासाने गाडी धकली, पण थोडे दूर जात नाही तो पुन्हा थांबली.पुनः चौकशी केली असता 'गाडीत बिघाड झाल्यामुळे केव्हा सुरू होईल होईल हे सांगता येत नाही' असे उत्तर आले.गाडी ना धड लोहारा गावत ना धड यवतमाळात.(या परिस्थितीमुळे 'ना घर के ना घाट के' म्हणजे काय ते कळून आले.) लोहारा ते यवतमाळ अंतर तसे तीन साडेतीन किलोमीटर.गाडी चालती असती तर दहा/पंधरा मिनिटात यवतमाळला पोहोचलो असतो.पण एवढ्या अंतरासाठी शकुंतलेने अख्खा एक तास घेऊनही मधेच मुक्काम ठोकला.सायंकाळ होत आली होती.रात्री पुनः यवतामाळातच कार्यक्रम होता.गाडी अशा ठिकाणी थांबली होती की, दुसरे कुठलेही वाहन मिळणे शक्य नव्हते.काय करावे कोणालाच सुचेना.बराच खल झाल्यावर सगळ्यांनी आपापली वाद्ये घेऊन रुळा रुळाने चालत रेल्वे स्टेशन गाठायचे व तेथून टांग्याने गावात आमच्या (ऑर्केस्ट्राच्या) रूमवर जायचे ठरले.गायक मंडळी आपापले गळे घेऊन निघाली.बाकी वादक मंडळी पण आपापले वाद्य घेऊन चालू लागली.या प्रकरणात बासरीवाला मजेत होता.सगळ्यात गोची माझी होती.कारण अकॉर्डियन...! तेही अवजड असे पियानो अकॉर्डियन.तबलेवाल्याने तबल्याची झोळी खांद्यावर घेतली.बॉंगोवाल्याने बॉंगो एका हातात घेतला.

कोंगोवल्याची पंचाईत झाली.त्याने सरळ ते धूड डोक्यावर घेतले.ते पाहून मीही अकॉर्डियनचे धूड डोक्यावर घेतले.व सगळेजण 'हर हर महादेव' म्हणत रस्त्याने (रुळाने) लागलो. यवतमाळच्या चौकीजवळ (सध्याचे दर्डा नगर) आल्यावर आमची 'वरात' पाहून आंबटशौकीन रसिक जमा होऊन गंमत बघायला लागले.आम्हाला मेल्याहून मेल्यासारखे झाले.पण इलाज नव्हता. कसे बसे स्टेशवर पोहोचलो व तेथून टांग्याने ऑर्केस्ट्राच्या खोलीवर! आयुष्यात पाहिल्यांदा या गाडीत बसलो.त्यानंतर बॉयलरचा धसका घेऊन पुनः प्रवास करण्याची हिंमत केली नाही.

--------------------------------------------------------------------

दि.१४ डिसेंबर २०२५ दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.



Thursday, December 11, 2025

अशी गावी मराठी गझल

● कविवर्य सुरेश भट यांच्या समर्थ लेखणीतून प्रसवलेल्या गझलांना खरा न्याय दिला तो आर्णी (जि.यवतमाळ) येथील #प्रख्यात_मराठी_गझल_गायक सुधाकर कदम यांनी. प्रसिद्ध मराठी कवी #कलीम_खान  यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली या जोडगोळीचा "#अशी_गावी_मराठी_गझल" 
हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला. इंदूर,उजैन,नागदा या मध्यप्रदेशातल्या शहरांमध्ये झालेल्या सुधाकर कदम आणि कलीम खान याच्या मैफिलीच्या आठवणी आजही तिथल्या रसिकांच्या मनात दरवळत आहेत. नंतर मराठी गझलेच्या क्षितिजावर भीमराव पांचाळे यांचा उदय झाला.

-डॉ.अजीम नवाज राही-
दै.सकाळ,नागपुर.दिं.११/११/२००९

------------------------------------------------------
         #मराठी_ग़ज़लें_भी_उर्दू_की_तरह_मधुर_होती_हैं
● इंदौर की इस अनोखी गजल निशा के दुसरे आकर्षण थे कलीम खान। सुधाकर कदमजी के संपूर्ण कार्यक्रम का संचालन अपनी मधुर आवाज और विशिष्ठ अंदाज मे कर उपस्थित मराठी भाषियों का दिल जीत लिया।

-प्रभाकर पुरंदरे
दै. चौथा संसार,इंदौर
डिसेंबर १९८९
------------------------------------------------------
 ● त्यांना (कलीम खान यांना) गझलेची खरी ओळख झाली ती सुधाकर कदम यांच्या संपर्कात आल्यानंतर! कदमांच्या अनेक गझल मैफिलींचे निवेदन कलीम खान करायचे. 

-अमोल शिरसाट
दै.अजिंक्य भारत,गझलयात्रा स्तंभ
३ मार्च २०२१


 

माझी कविता...


 

काही भिकारड्यांना दिलदार मानले मी...


 

माझी मस्ती,माझे जगणे...


 

माझी कविता


 

गझल


 

Tuesday, December 9, 2025

तुझे तुला जगायचे...

 


हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे

कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे
खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे

सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे
पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे

मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या
म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे

हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही
कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे

गायक - मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिंदे

गझल आणि संगीत गझलगंधर्व सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे

Sunday, December 7, 2025

सुरेश वाडकर,सुधाकर कदम ...ध्वनिमुद्रण,आजिवासन स्टुडिओ,

 



सुरेशजींसोबत काम करण्यात मजा येते. हा व्हिडीओ त्याची साक्ष आहे. #सुरेश_वाडकर  #सुधाकर_कदम

सांजवेळी


काय होते या मनाला सांजवेळी

ही उदासी दाटते का सांजवेळी


येत नाही गीत ओठी नेहमीचे

आसवेही मूक होती सांजवेळी


प्रेम केले हाच का माझा गुन्हा, 

एकटी मौनात जळते सांजवेळी


दूर कोठे सूर उठता बासरीचा

होत जातो दर्द गहिरा सांजवेळी


गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे

शब्द आणि संगीत - #गझलगंधर्व​ सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.

तुझ्या रूपाचा गुलाब ताजा...

तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे
अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे...

उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची
क्षणभर झाला भास मलाही अजून मी चांदण्यात आहे

कधीच नाही मला भेटली रूपगर्विता वसंतसेना
तरी कुणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या बनात आहे

गायक - मयूर महाजन 
शब्द - म.भा.चव्हाण
संगीत - #गझलगंधर्व​ सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.


 

The pioneer gazal singer in Marathi.

 वर्ष १९८१

     बॅ.अंतुले मुख्यमंत्री असतांना,नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मा.रा.सु.गवई यांचे कॉटेजवर एका भव्य शामियान्यात काव्य - संगीत मैफल सुरेश भटांनी आयोजित केली होती.मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे गवई साहेबांच्या कॉटेजवरच होतो.या मैफिलीत एक तरूण गायक मराठी गझला पेश करून उपस्थितांची दाद घेताना मी पाहिला.मैफिल अतिशय सुंदर झाली.कार्यक्रमानंतर अंतुले साहेबांचे हस्ते त्या तरुणाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याच प्रसंगी मा.जवाहरलालजी दर्डा यांनी त्या तरूण गायकाला मिठी मारुन ’हा आमच्या यवतमाळचीच नव्हे तर विदर्भाची शान आहे’ असे जाहीरपणे सांगितले. शामियान्याच्या एका कोप-यात उभे राहून हा सर्व सोहळा मी याची देही याची डोळा पाहिला.हा तरूण गायक म्हणजे सुधाकर कदम होय. सुधाकर कदमांना मी सर्वप्रथम येथे पाहिले.यावेळी सुरेश भटांसोबत सावलीप्रमाणे वावरणारा एक तरुण होता.त्याचे नाव शाहिर सुरेशकुमार वैराळकर.


     त्या नंतर मा.शरद पवारांनी वर्धा या गावी १८ ते २० सप्टेंबर १९८१ ला भव्य शेतकरी मेळावा घेतला होता.तेथेही सुधाकर कदमांचा कार्यक्रम झाला.त्यात ’सूर्य केव्हाच आंधारला यार हो’ ही सुरेश भटाची गझल गाऊन समा बांधला होता.या प्रसंगी शरद पवार,पद्मसिंह पाटील,सुधाकरराव देशमुख,रावसाहेब वडनेरकर,सुरेश भट,ना.धो.महानोर,विट्ठल वाघ,प्रा.देविदास सोटे वगैरे मंडळी उपस्थित होती.


    त्या नंतर यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी दि.२७ व २८ मार्च १९८२ ला बाबुराव बागुल यांचे अध्यक्षतेखाली दलित साहित्य सम्मेलन झाले.याचे उद्घाटन म.रा.साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र बारलिंगे यांचे हस्ते झाले होते.तेथेही मी होतो.या साहित्य संम्मेलनात सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा रंगलेला कार्यक्रम मी स्वतः पाहिला.या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही कलाकार महाराष्ट्रात नव्हता.आणि जे कोणी करत असतील तो फुटकळ स्वरुपाचा प्रयत्न असावा.तसे नसते तर सुरेश भटांनी निश्चीतच या संदर्भात कोणाचा तरी उल्लेख केला असता.या कालावधीत औरंगाबादचे नाथ नेरळकरही आशालता करलगीकर यांना सोबत घेऊन हिमांशु कुळकर्णी यांच्या गझलांचे कार्यक्रम करीत असल्याचे दिसून येते.परंतू पुढे त्यांनी ते बंद केले.तरीही जर कोणी दावा करीत असेल तर त्याने लेखी पुरावे द्यावे.मी मरेपर्यंत त्याची गुलामी करीन.


     १९८१ मध्ये ’#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन’म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले.१९८२ मध्ये ’#गझलनवाज’उपाधी दिली.१९८३ मध्ये महाराष्ट्र जेसीजने ’#Out_Standing_Young_Person'हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले.गोंदिया येथे ३०/१०/१९८३ रोजी मा.छेदीलालजी गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.(जेसीजने दिलेल्या सन्मानपत्रात ’#Pioneer_in_the_introduction_of_MARATHI_GAZALS' असा स्पष्ट उल्लेख आहे.) आता मला सांगा वरील सर्व मान-सन्मान सुधाकर कदमांना काहीच न करता मिळाले असतील काय ? या अगोदर ५/७ वर्षे तरी त्यांनी मराठी गझल गायकीसाठी मेहनत घेतली असेल ना ?


     मराठी गझल गायकीला तशी फार मोठी परंपरा नाही.जास्तीत जास्त ३५ वर्ष,फारच ओढाताण केली तर ४० वर्षे,बस्स ! तेही ओढून ताणूनच,त्यापलीकडे ही परंपरा जात नाही.त्यातही महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांचे लेखी पुरावे जर पाहिले तर हा काळ आणखी कमी होतो.आणि इतिहास लिहीतांना तोंडी माहितीपेक्षा लेखी माहितीला जास्ती महत्व असते.लेखी पुरावे आणि विविध संस्थांनी मराठी गझल गायकीतील योगदानाबद्दल दिलेल्या पुरस्कारांचा विचार केला तर मराठी गझल गायकीची सुरवात सुधाकर कदम यांचे पासून झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या काळात सुरेश भट आणि सुधाकर कदम विदर्भात फिरले.नंतर मराठवाडा आणि शेवटी पश्चिम महाराष्ट्र.या वेळी कार्यक्रमाचे निवेदन कधी स्वतः सुरेश भट तर कधी डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.३/४ वर्षे महाराष्ट्रभर भ्रमंती केल्यानंतर "#अशी_गावी_मराठी_गझल" ह्या कार्यक्रमाची सांगता १५ जुलै १९८२ ला पुण्यात महाराष्ट्र परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात झाली.या कार्यक्रमाचे निवेदन स्वतः सुरेश भटांनी केले.प्रमूख उपस्थिती डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांची होती.आयोजक होते ग.वा.बेहरे (कार्याध्यक्ष,महाराष्ट्र साहित्य परिषद) आणि राजेंद्र बनहट्टी (कार्यवाह,म.सा.प.).


     यानंतर कदमांनी एकट्याने कार्यक्रम करणे सुरु केले.या कार्यक्रमाचे निवेदन आर्णीचे कवी कलीम खान करायचे.(काही कार्यक्रमांचे निवेदन प्रसिद्ध कवी प्रा.नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी सुद्धा केले) मध्यप्रदेशातील इंदूर येथील जाल सभागृहातील दि.२८ ऑक्टोबर १९८९ चा कार्यक्रम या दोघांनी चांगलाच गाजवला.मराठी गझल गायनाचा मध्यप्रदेशातील हा पहिला वहिला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध रंगकर्मी श्री बाबा डिके आणि अभिनेता चंदू पारखी उपस्थित होते.


"अशी गावी मराठी गझल" या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...


१) स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-ऑपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. ..............

●दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१


२) कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात..............

●दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२


३) सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला............

●दै. तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.


४) सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे............

.●सुभाष इनामदार, सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ आँगष्ट १९८२.


५) सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला........................... 

●दै.लोकसत्ता,२३/७/१९८२.


६) ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला..............

●दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२.


७) मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी.......... ●दै.सकाळ,पुणे.


८) गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते.......................

●अनंत दीक्षित,दै.सकाळ,कोल्हापुर.६ जुलै १९८२


९) सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले............

●दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२


१०) Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches................

●The Hitwad,Nagpur.23/4/1984


११) सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली...

●दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४


१२) कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला असावा............

●दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४


१३) मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है....................

●दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९


-#मस्त_कलंदर

१४.१०.२०११








संगीत आणि साहित्य :