'तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावात मी...'
मराठी गझल गायकीच्या अगदी सुरवातीच्या, म्हणजे सुरेश भट आणि मी महाराष्ट्रभर फिरत असतानाच्या काळातील कार्यक्रमात गायिलेली '#जगलो_असाच_कसा_तरी' ही गझल जुन्या जीर्ण कॅसेटमध्ये सापडली.पण कॅसेट इतकी खराब झाली होती की, त्यातील फक्त शेवट कसातरी उतरवता आला. सुरेश भटांनी आग्रहाने ही गझल माझ्याकडून स्वरबद्ध करून घेऊन कार्यक्रमात गायला लावली होती. ही गझल कधी ते त्यांच्या पद्धतीने सादर करायचे, कधी मला गायला सांगायचे. त्या काळात दोन वा तीन माईकवर कार्यक्रम करावा लागायचा. ते पण दर्जेदार असतीलच असे नव्हते.त्या त्या साउंड सिस्टिमवाल्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार चांगले/वांगले असायचे. आमच्यासमोर ''मॉनिटर' पण नसायचे.
कार्यक्रमाची सगळी मदार साउंड सिस्टिमवाल्यावर असायची. रसिकांकडून दाद आली तर कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे असे समजायचे. कार्यकम चांगला वा वाईट करणे त्याच्या मर्जीवर असायचे.
बिघडवायला तर भोंग्याने मारलेल्या दोन/चार शिट्ट्या सुद्धा पुरायच्या. सिस्टिमवल्याकडे जास्ती करून 'आहुजा' कंपनीचा एम्प्लिफायर,टेप रेकॉर्डर असायचे.हे सुद्धा साउंड सिस्टिमवाल्याने आहुजच्या डेकवर केलेले रेकॉर्डिंग आहे. प्रत एकदमच खराब आहे.तरी पण अनवट रागात कंपोझिशन
असल्यामुळे आपल्या समोर ठेवत आहे.गोड करून घ्यावी.ही विनंती.
सारंगी - मरहूम उस्ताद लतीफ अहमद खान
तबला - तालमणी प्रल्हाद माहुलकर
●headphone or earphone please...
No comments:
Post a Comment